राष्ट्रीय सेवा योजना तर्फे महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी 20-21


     आज दिनांक 23/01/2021 राष्ट्रीय सेवा योजना व योगेश्वरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.आर.व्ही.कुलकर्णी हे होते. प्रमुख पाहुणे व व्याख्याते प्रा.डॉ.एम.पी. देशपांडे यांनी ओघवत्या शैलीत नेताजींच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला तर डॉ. आर.व्ही.कुलकर्णी यांनी अध्यक्षीय समारोप केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.आर. जी.जोशी यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.सारिका संगेकर यानी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी डॉ.एम.डी. आचार्य यांनी केले.या प्रसंगी अंतर्गत मूल्यमापन कक्षाचे समन्वयक डॉ. व्ही.एस.हमदे, उप प्राचार्य व्ही.एन. जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.