
योगेश्वरी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 2022-23 या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्बोधन वर्ग व राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. डॉ. इंद्रजीत भगत हे लाभले . त्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत रंजकदार पद्धतीने मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजनेच्या अधिकारी डॉ. सारिका संगेकर यांनी केली. विद्यार्थिनी चारुशीला काळम व विद्यार्थी शरद कांबळे या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मागील अनुभव सांगितले. माजी राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉ. अनिल नरसिंगे व डॉ. यशवंत हंडिबाग यांनीही मुलांना समयोचित मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात आजादी का अमृत महोत्सव दिनानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले . अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आर. व्ही.कुलकर्णी यांनी केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉ. संतोषकुमार सुर्वे यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉ.महेंद्र आचार्य डॉ. सारिका संगेकर व डॉ. संतोष कुमार सुर्वे यांनी केले. शिक्षकेतर कर्मचारी श्री. वामन जूजगर व रविकांत मंत्री यांनी विषेश परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विद्यार्थीनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.