Select Page
पटनाट्य “एक हात माणूसकीसाठी एक हाक तिच्यासाठी” सादरीकरण.. माननीय न्यायालय अंबाजोगाई

दि. 14 ऑक्टोबर 2021 रोजी योगेश्वरी महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जिल्हा सत्र न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत बेटी बचाव बेटी पढाव अशा विषयाचे प्रहसन सादर करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात ते सादर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हा सत्र न्यायालयातील सर्व न्यायाधीश व कनिष्ठ स्तर न्यायाधीश उपस्थित होते. योगेश्वरी महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या कार्यक्रमासाठी विजय अंजान व ढगेसर यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. आर. डी .जोशी व उपप्राचार्य डॉ. आर.व्ही. कुलकर्णी  हे जातीने उपस्थित होते तसेच तसेच राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ एम. डी. आचार्य ,डॉ.सारिका संगेकर डॉ.संतोष सुर्वे व डॉ. सुरेश जाधवर ते कार्यक्रमासाठी उपस्थित होते.