Select Page

 

योगेश्वरी महाविद्यालयात दिनांक 27 नोव्हेंबर 2021 ( शनिवार) रोजी क्रिओस इन्फो सोल्युशन, पुणे या नामांकित आय.टी कंपनी तर्फे आंबेजोगाई सेल्स फोर्स ग्रुप चे उद्घाटन करण्यात आले. आंबेजोगाई सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आय.टी क्षेत्रातील उपलब्ध रोजगारांच्या संधी, भविष्यातील त्यांची त्या दृष्टीने पूरक वाटचाल यासंबंधी मार्गदर्शन करणे व कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करणे हा कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. यासाठी क्रिओस इन्फो सोल्युशन चे मुख्य तांत्रिक सल्लागार श्री आनंद कुलकर्णी, वरिष्ठ सल्लागार तसेच वास्तुविशारद (PWC India) चे श्री आश्विन भट्ट हे उपस्थित होते. याप्रसंगी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश खुरसाळे यांनी आंबेजोगाई सेल्स फोर्स ग्रुप चे उद्घाटन कळ  दाबून केले. यावेळी कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड झालेल्या कुमारी माधवी पाठक, श्री बालाजी कसबे, श्री श्रीकांत कुलकर्णी, श्री स्वप्नील खाकरे, कुमारी निकिता गोरशेटे, कुमारी मेघना परिहार, श्री बाळकृष्ण अनवणे व कुमारी माधुरी महानुभाव या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री आनंद कुलकर्णी यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने कॅम्पस इंटरव्ह्यू साठी भाग घेण्याची तयारी करण्याचे कळकळीचे आवाहन केले. त्यानिमित्ताने एक छोटेसे प्रेझेंटेशन देण्यात आले. त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परिसरात रोबोटिक्स लॅब निर्माण करून देण्याची घोषणा श्री आनंद कुलकर्णी यांनी केली. आपल्या अध्यक्षीय समारोपात डॉक्टर सुरेश खुरसाळे यांनी योगेश्वरी शिक्षण संस्था अशा उपक्रमात विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहील अशी ग्वाही दिली व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनोद गंगणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  संगणक विभाग प्रमुख डॉ. आर जी जोशी यांनी केले तर श्री एस एस कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगणक विभागातील प्राध्यापक डॉ. उदय थेटे, डॉ महेंद्र आचार्य, श्री किरण कुलकर्णी व कु. ऋतुजा रामदासी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री गणपत व्यास गुरुजी, प्राध्यापक गोळेगावकर सर, प्राचार्य डॉ. आर डी जोशी, उपप्राचार्य डॉ. आर व्ही कुलकर्णी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संगणक विषयाचे बी.एस.सी, बीसीएस, बीसीए, एम एस सी वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.