‘                     जागतिक विद्यार्थी दिनाच्या‘ निमित्ताने दिनांक 15 ऑक्टोबर 2019 रोजी ग्रंथालयात एक आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला. निमित्त होते आपल्या संस्थेची माजी विद्यार्थिनी प्रियांका सुगावे मोहोळकर हिने ग्रंथालयात रात्रअभ्यासिकेत अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त भेट वस्तू दिल्या. ती सध्या Sandiago ( USA) येथे वास्तव्यास आहे. या निमित्ताने 33 विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव मा. व्यास गुरुजी, सहसचिव मा. गोळेगावकर सर, प्राचार्य डॉ. यू. डी. जोशी सर यांच्या हस्ते सॅक वितरित करण्यात आल्या. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन करून उपक्रमाची प्रशंसा केली. प्रास्ताविक करून डॉ. आर. व्ही. कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. डॉ. गणेश पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी प्रियांकाची आई रजनी देशपांडे, रेणुका कुलकर्णी, श्री. कप्पे व विद्यार्थी उपस्थित होते.