(Click on Image to Zoom)

                       डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विध्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना व IQAC विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑनलाईन योगदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन 21 जून 2021 रोजी सकाळी 8:00 ते 9:00 दरम्यान मा.सस्थेचे सहसचिव मा.एन.के.गोळेगावकर सर यांच्या उपस्थितीत घेण्यात आले यासाठी योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक ही उपस्थित होते. या जागतिक योग दिनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.डी. जोशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर.व्ही.कुलकर्णी ,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. महेंद्र आचार्य व प्रा.डॉ. सारिका संगेकर यांनी नियोजन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.