(Click to zoom)
योगेश्वरी महाविद्यालयात सोमवारी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त योगेश्वरी महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. सारिका जगताप यांनी नियोजन करून मुलांसाठी व मुलींसाठी फिटनेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये मुलांसाठी पुशअप्स, सीटअप्स, शटल रन आणि स्टॅंडिंग जम्प तर मुलींसाठी पुश अप्स,शटल रन आणि स्टॅंडिंग जम्प या चाचण्यांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ आर. व्ही. कुलकर्णी यांनी क्रिडा दिनाची माहिती देवून हॉकीचे जादुगार म्हणून ओळखले जाणारे पद्मविभूषण मेजर ध्यानचंद यांच्या कार्याची ओळख करून दिली. मेजर ध्यानचंद यांचे आत्मचरित्र ‘गोल्स’ विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचावे असे आवाहन त्यांनी केले. आय क्यू ए सी समन्वयक डॉ. यशवंत हंडीबाग यांनीही विद्यार्थ्यांना नियमित व्यायामाचे महत्त्व पटवून देवून त्यांचेसमोर स्वतःचे अनुभव कथन केले. या प्रसंगी कार्यालय अधिक्षक श्री. अजय चौधरी , वरिष्ठ लिपिक श्री. राजकुमार साळवी , श्री. महादेव धायगुडे तसेच इतर प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. मंगेश दासूद, श्री. फारूख यांनी परिश्रम घेतले.