योगेश्वरी महाविद्यालयात गांधी ग्लोबल सोलार यात्रेला उत्तम प्रतिसाद

 

            योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई व आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 2 ऑक्टोबर 2019 रोजी “गांधी ग्लोबल सोलार यात्रा” याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत पंचावन्न विद्यार्थ्यांना सोलार लॅप बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सुमारे 160 देशांमध्ये आज राबवल्या गेलेल्या या कार्यक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात येणार आहे. भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ आर जे टोपरे यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागात झालेल्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे , सचिव जी. बी. व्यास,ज्येष्ठ सल्लागार अँड. व्ही. के. चौसाळकर कोषाध्यक्ष प्रा. माणिकराव लोमटे, सहसचिव प्रा. एन. के. गोळेगावकर, प्राचार्य भीमाशंकर शेटे, प्रा. सुरेश देशमुख , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ यू. डी. जोशी, उपप्राचार्य डॉ.आर. व्ही. कुलकर्णी उपप्राचार्य प्रा.पंडित कराड तसेच कृष्णाजी चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्नीक चे प्राचार्य रमण देशपांडे व महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.