रस्ता सुरक्षा अभियान

योगेश्वरी महाविद्यालयात “रस्ता सुरक्षा अभियान” राबविण्यात येत आहे. योगेश्वरी महाविद्यालयाच्या नागापुरकर सभागृहात या कार्यक्रमाचे

उद्‌घाटन झाले. परवाना व हेल्मेट शिवाय वाहने चालवू नका, वाहन चालविण्याचा परवाना व डोक्यावर हेल्मेट असल्याशिवाय विद्यार्थ्यांनी वाहने चालवू नयेत, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी केले.  अध्यक्षस्थानी प्रा.माणिकराव लोमटे होते. तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशुतोष बारकुल, आगारप्रमुख नवनाथ चौरे, योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य उदय जोशी, प्रभारी प्राचार्य प्रवीण भोसले, सहसचिव शिशिर बेळुर्गीकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या वेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांनी रस्ता सुरक्षेसंदर्भात पॉवर पॉइंट प्रेझेटेशनद्वारे विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम सांगितले परवान्याशिवाय वाहन चालवणे कायद्याने गुन्हा आहे. पालकांनीहो अठरा वर्षांखालील पाल्यांना वाहने देऊ नयेत, वाहनांची वेळोवेळी पीयूसी करून घ्यावी. जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन बारकुल यांनी केले. प्रा. माणिकराव लोमटे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. मोटार वाहन निरीक्षक दत्तात्रय गाढवे यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी प्रा. डॉ. गणेश पिंगळे, नवनाथ चौरे, प्राचार्य उदय जोशी हे उपस्थित होते. श्री गणेश पिंगळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. सहायक मोटार वाहन निरीक्षक शरदचंद्र वाडकर यांनी वाहन वेगात चालवू नका असे विशद केले. या कार्यक्रमास उपप्रादेशिक कांबळे, श्री फड, श्री तांगडे व परिवहन कार्यालयातील सहायक कर्मचारी श्री एडके, श्री बळवंत मोटार निरीक्षक श्री पारशेट्टे याची उपस्थिती होती.