योगेश्वरी महाविद्यालयात मोफत मास्क वाटप

अंबाजोगाई. दि.14-12-2020 योगेश्वरी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व ग्राम ऊर्जा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी याना मोफत मास्क वाटप करण्यात आले.संस्थेचे सचिव मा.गणपत व्यास, कार्यकारी उपाध्यक्ष मा.कमलाकरराव चौसाळकर यांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी ग्राम ऊर्जा फौंडेशनचे पदाधिकारी, प्राचार्य डॉ. उदय जोशी,उपप्राचार्य डॉ. आर.व्ही.कुलकर्णी आणि रा.से.यो.कार्यक्रमाधिकारी डॉ.एम.डी. आचार्य हे उपस्थित होते.